सुनील दत्त यांनी मृत्यूपूर्वी परेश रावल यांना का लिहिलं होतं पत्र? वाचा सविस्तर
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुनील दत्त यांनी मृत्यूपूर्वी परेश रावल यांना का लिहिलं होतं पत्र? वाचा सविस्तर

सुनील दत्त यांनी मृत्यूपूर्वी परेश रावल यांना का लिहिलं होतं पत्र? वाचा सविस्तर

Payal Shekhar Naik HT Marathi
May 25, 2022 08:50 PM IST

मृत्यूच्या काही तास आधी सुनील यांनी त्यांचे मित्र परेश रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं होतं.

<p>परेश रावल- सुनील दत्त</p>
<p>परेश रावल- सुनील दत्त</p>

बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते सुनील दत्त यांचं २५ मे २००५ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. ते बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेते आणि निर्माते होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. परंतु, अशी एक गोष्ट होती ज्याचा खुलासा त्यांच्या मृत्यूनंतर झाला. परंतु, त्यांच्या वागण्याचं कोडं आजही कुणाला उलगडलेलं नाही. मृत्यूच्या काही तास आधी सुनील यांनी त्यांचे मित्र परेश रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं पत्र लिहिलं होतं. हे पत्र लिहिल्यानंतर काही तासांतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

या गोष्टीचा खुलासा परेश यांनी एका मुलाखतीत केला होता. परेश म्हणाले, 'मी चित्रीकरण करत होतो तेव्हा मला सुनील गेल्याचा फोन आला आला आणि मी हादरून गेलो. मी घरी फोन करून माझ्या पत्नीला म्हणालो की मला यायला उशीर होणार आहे. त्यावर माझ्या पत्नीने मला म्हटलं की तुमच्यासाठी एक पत्र आलंय. मी विचारलं कुणाचं आहे तर म्हणाली की सुनील दत्त यांचं आहे. त्यांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझा विश्वास बसत नव्हता तर तिने ते पत्र वाचून दाखवलं. त्या पत्रात लिहिलेलं, प्रिय परेश मला माहितीये तुझा वाढदिवस पाच दिवसानंतर आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. हे ऐकून मला वाटलं हे कसं शक्य आहे.'

ज्या मित्राला सुनील यांनी कधीही कसल्याच शुभेच्छा दिल्या नाहीत त्यांनी अचानक परेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा का दिल्या आणि तेही पाच दिवस आधी? या घटनेच्या खुलाशानंतर प्रत्येकाला सुनील यांच्या वागण्याचं अप्रूप वाटलं. सुनील यांनी पाठवलेलं पात्र त्यांच्या लेटरहेड वर लिहिलेलं होतं. कारण त्यावेळेस ते संसदेचे अध्यक्ष होते. त्यामुळे हे पत्र पाहून प्रत्येकजण चकित झाला होता.

Whats_app_banner