बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने ९०चा काळ काजवला होता. सुनीलने आजवर तामिळ, तेलुगू, इंग्रजी, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले. आता सुनील शेट्टी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
सुनील शेट्टी हा मुलगा अहानसोबत उज्जैनमधील भगवान महाकालच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. सुनीलसोबत मध्य प्रदेशचे मंत्री राकेश सिंह देखील भस्मारतीसाठी बसलेले दिसत आहेत. दरम्यान, सुनील शेट्टीने पांढऱ्या रंगाचे धोतर, अंगावर पांढऱ्या रंगाचा कपडा घेतला आहे. तसेच कपाळी टिळा लावल्याचे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील शेट्टीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: सईचं नशीब फळफळलं! भूमी पेडणेकरसोबत दिसणार 'या' बॉलिवूड सिनेमात
आजकाल अनेक बॉलिवूड कलाकार हे उज्जैनला जाऊन महाकालचे दर्शन घेताना दिसतात. तेथील पहाटेची महाआरती करताना दिसतात. आता सुनील शेट्टी देखील मुलासोबत महाकालच्या दरबारी पोहोचला आहे. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
सुनील शेट्टीच्या कामाविषयी बोलाचे झाले तर त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा मिशन रणिगंज हा चित्रपट आला होता. त्यापूर्वी घनी, मराक्कर, मुंबई सागा, दरबार, पैलवान या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. सुनील हा चित्रपटसृष्टीमध्ये सध्या फारसा सक्रिय नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो.