मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suniel Shetty : मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Suniel Shetty : मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब! व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Jul 10, 2024 08:21 PM IST

Suniel Shetty Sbooch: सुनील शेट्टीने सोशल मीडियावर एका असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहते गोंधळात पडले आहेत. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आपलं ‘स्बूच’ हरवल्याचं म्हणत आहे.

मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब!
मेकअप रूममधून तासाभरासाठी बाहेर पडलेल्या सुनील शेट्टीचं समान झालं गायब!

Suniel Shetty Sbooch: आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीचे नाव आवर्जून घेतले जाते. सुनील शेट्टी याने विनोदी असो वा गंभीर सगळ्याच भूमिका तुफान गाजवल्या आहेत. अभिनेता असण्यासोबतच उद्योजक देखील आहे. वेगवेगळ्या बिझनेसमधून देखील तो भरपूर कमाई करतो. मात्र, आता त्याने सोशल मीडियावर एका असा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे प्रेक्षक आणि चाहते गोंधळात पडले आहेत. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आपलं ‘स्बूच’ हरवल्याचं म्हणत आहे. आता त्याच्या या व्हिडीओने चाहत्यांची आतुरता तर वाढवलीच, पण नक्की काय झालं असावं अशी चिंता देखील निर्माण केली आहे.

अभिनेता सुनील शेट्टी याने शेअर केलेल्या या एक मिनिटाच्या टीझर व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुनील शेट्टी मेकअप करून शूटसाठी बाहेर जात आहे. यावेळी तो आपल्या सहाय्यकाच्या हातात एक ट्रे देऊन त्यात काही ‘स्बूच’ लिहिलेल्या काही बॉटल्स ठेवल्या आहेत. शॉटसाठी बाहेर जात असताना तो आपल्या सहाय्यकाला ‘स्बूच’चे सावधगिरीने रक्षण करण्यास सांगतो. बाहेर जाताना तो पुन्हा एकदा विनंती करताना दिसतो. पण, जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्या या ट्रेमधु स्बूच गायब झालेलं त्याला दिसतं.

ट्रेंडिंग न्यूज

कोणी चोरला स्बूच?

‘स्बूच’ हरवल्यामुळे सुनील शेट्टी गडबडून जातो आणि आजूबाजूला शोधाशोध करू लागतो. इतकंच नाही तर, आपल्या सहाय्यकाला आणि संपूर्ण क्रूला सतत प्रश्न विचारतो की, ‘स्बूच’ कुठे आहे? कुणी नेलं? मात्र, कुणीही त्यावर उत्तर देत नाही. या रोमांचक व्हिडीओमुळे सुनील शेट्टीच्या सेटवर ही उलथापालथ कशामुळे होत आहे आणि त्याचा ‘स्बूच’ कोणी चोरला आहे, हे जाणून घेण्याची आतुरता वाढली आहे. याविषयी वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. मात्र, आता हे नेमकं प्रकरण काय आहे, हे लवकरच त्याच्या चाहत्यांना कळणार आहे.

चाहते आणि प्रेक्षक सुनील शेट्टीचा नवा चित्रपट येतोय का?, असा प्रश्न विचारात आहेत. तर, काही जण या नावावरून तो एखाद्या वेब सीरिजमध्ये झळकणार असल्याचे देखील म्हणत आहेत. तर, दुसरीकडे त्याने ‘द न्यू कल्चर’ म्हटल्याने काही जण तो नवीन ब्रँड सुरू करत असल्याचा कयास बांधत आहेत. आता सुनील शेट्टी स्वतः लवकरच या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. इतकंच नाही तर, ‘स्बूच’ कुठे गेलं, याचं उत्तरही मिळणार आहे.

WhatsApp channel
विभाग