बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी इंडस्ट्रीतील अशा स्टार्सपैकी एक आहे जो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सुनील सध्या 'हेरा फेरी ३' मुळे चर्चेत आहे. 'हेरा फेरी ३'ची बातमी समोर आल्यापासून दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. अशातच 'हेरा फेरी ३'मधील मुख्य पात्र परेश रावल चित्रपटातून बाहेर पडल्याच्या बातमीने निर्मात्यांनाच नव्हे तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. अशातच आता या कॉमेडी चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटात बॉलिवूडच्या एका हँडसम अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल.
कार्तिकची एन्ट्री
सुनील शेट्टीने नुकतेच झूमशी बोलताना 'हेरा फेरी ३' या चित्रपटाविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. या मुलाखतीत सुनीलने परेश रावल यांच्या बाहेर पडण्याबाबतही भाष्य केलं. इतकंच नाही तर सुनीलने या चित्रपटात एका बॉलिवूड अभिनेत्याच्या एन्ट्रीचा ही खुलासा केला. हा अभिनेता दुसरा कोणी नसून कार्तिक आर्यन आहे. सुनीलने सांगितले की, कार्तिकची एन्ट्री 'हेरा फेरी ३'मध्ये झाली आहे. आपल्या भूमिकेबद्दल अभिनेता म्हणाला, 'त्याला नव्या व्यक्तिरेखेसह आणलं जाऊ शकतं. या चित्रपटातील कोणत्याही व्यक्तिरेखेची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ज्याप्रमाणे 'शोले'मध्ये बसंती-धन्नोची जागा जय-वीरू घेऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे या चित्रपटातील पात्रांची जागा ही घेता येणार नाही.
यासोबतच सुनील शेट्टी म्हणाला की, 'अक्षय कुमार आणि फिरोज भाई यांच्यासोबत सध्या सर्व काही ठीक आहे. आता लवकरच हा चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यातील कलाकारांना नाही, तर त्यातील पात्रांना जाते. कार्तिक कोणाचीही जागा घेणार नाही. एक फ्रेश कॅरेक्टर म्हणून त्याची ओळख करून दिली जाणार आहे. '
संबंधित बातम्या