आपल्या आवडत्या गायकाची गाणी लाइव्ह ऐकण्यासाठी चाहते लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सहभागी होतात. अनेक ठिकाणी या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात येते. पण या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान अनेक घटना घडताना दिसतात. चाहते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान कधी फुले आवडत्या गायकावर उधळताना दिसतात. तर कधी काही तरी विचित्र प्रकार करताना दिसतात. नुकताच गायिका सुनिधी चौहनच्या कॉन्सर्टमध्ये असेच काहीसे घडले. सुनिधीने यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
बॉलिवूड गायिका सुनिधी चौहनने दमदार आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना वेड लावले आहे. सुनिधीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. सुनिधीच्या आवाजाची जादू इतकी पाहायला मिळते की तिची एक झलक पाहण्यासाठी तुडूंब गर्दी होते. पण एका कॉन्सर्टदरम्यान परफॉर्म करताना सुनिधी चौहनसोबत असे काही घडले की तिला देखील धक्का बसला आहे. एका चाहत्याने चक्क पाण्याची बाटली फेकून मारली आहे. सोशल मीडियावर सुनिधीच्या कॉन्सर्टचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करुन संताप व्यक्त करत आहेत.
वाचा: 'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल
सुनिधीने नुकताच 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला अंदाज आला होता की व्हिडीओ व्हायरल झाला आहे. माझ्यासोबत असे पहिल्यांदाच झाले आहे. चाहत्याने माझ्यावर जाणूनबुजून बाटली फेकलेली नाही. मी माझे शेवटचे दुसरे गाणे गात होते. समोर जमा झालेल्या गर्दीमध्ये मस्ती सुरु होती. तेव्हा त्यांनी हवेत बाटली फेकली होती. तेवढ्यात दुसरीकडून एक बाटली स्टेजवर येऊन पडली. त्या बाटलीमध्ये पाणी असल्यामुळे ती जास्त पुढे येऊ शकली नाही. मी तेवढ्यात म्हणाले हे काय सुरु आहे? शो थांबेल' असे सुनिधी म्हणाली. दुसरीकडून चाहत्यांनी 'नाही, कृपया असे करु नका' असे म्हटले.
वाचा: ‘द कपिल शर्मा शो’ दोन महिन्यातच होणार बंद? अर्चना पूरण सिंहने चाहत्यांना दिला झटका
सुनिधीने पुढे सांगितले की, 'बाटली मायक्रोफोवर जोरात येऊन पडली. मी थोडक्यात बचावले. जर माइक माझ्या तोंडाजवळ असता तर मला दुखापत झाली असती. काही लोकांनी कलाकारांसोबत हे मुद्दाम केले होते. त्यांच्या अंगावर वस्तू फेकल्या, चुकीची वागणूक दिली. हे सर्व चुकीचे आहे.'
वाचा: 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या
संबंधित बातम्या