मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, 'सुख कळले' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, 'सुख कळले' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 21, 2024 12:40 PM IST

Sukh Kalale: आज २१ जून रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये विशेष भागाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sukh Kalale: वटपौर्णिमा विशेष भाग
Sukh Kalale: वटपौर्णिमा विशेष भाग

वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. सर्वसामान्य महिलांपासून ते मालिकेतील अभिनेत्रींपर्यंत जवळपास सगळ्याच जणी हा सण साजरा करतात. आता कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये देखील हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यता आला आहे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये 'इंद्रायणी' या मालिकेतील शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून 'अंतरपाट' मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे 'अबीर गुलाल' मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून 'रमा -राघव' मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. 'पिरतीचा वनवा उरी पेटला ' या मालिकेतून सावी अर्जुनची साथ मागत आहे. तर, सुख कळले या मालिकेतून मिथिला तिच्या सुखी संसारासाठी प्रार्थना करत आहे.
वाचा: दाक्षिणात्य हॉरर सिनेमा 'नमस्ते घोस्ट' घर बसल्या पाहायचा? मग जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर पाहाता येणार

'इंद्रायणी' मालिकेत विशेष भाग

प्रत्येक मालिकेत सध्या वटपौर्णिमेचा खास ट्रॅक सुरु आहे. 'इंद्रायणी' या मालिकेत तुम्ही पाहू शकता की , वटपौर्णिमेच्या शुभदिनी शकुंतला पूजेसाठी इंदूला घेऊन जाते. आनंदी या समारंभात इंदूच्या उपस्थितीवर आक्षेप घेते. परंतु झाडाजवळ साप दिसल्यावर इंदू धैर्याने अधूला जवळ घेत त्याचे सापापासून रक्षण करते.
वाचा: शुटिंगदरम्यान बॉलिवूड दिग्दर्शकाला दादा कोंडकेंनी खायला घातली होती बटाट्याची भाजी, वाचा किस्सा

सावी अर्जुनसाठी करणार वटपौर्णिमेची पूजा

'पिरतीचा वनवा उरी पेटला' या मालिकेत आपल्याला दिसतंय की , एकीकडे सावी अर्जुनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असून बाच्याला सावीबद्दल भावना निर्माण होत आहेत. 'सुख कळले' या मालिकेत माधव मिथिलाला वचन देतो की, वटपौर्णिमेपर्यंत तो बँकेच्या फसवणुकीमागील खरा गुन्हेगार कोण आहे, हे शोधून काढणार आहे.
वाचा: शिवाच्या बहिणीसाठी आशू करणार गुंडांशी दोन हात, झी मराठी मालिकांमध्ये 'वटपौणिमा' विशेष भाग

कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये आज विशेष भाग दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेले पोहोचली आहे. आजच्या भागांमध्ये काय घडणार हे पाहण्यासाठी नेटकरी आतुर आहेत.

WhatsApp channel
विभाग