Jacqueline Fernandez: माय बेबी...; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jacqueline Fernandez: माय बेबी...; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र

Jacqueline Fernandez: माय बेबी...; तुरुंगातून सुकेशने पुन्हा लिहिले जॅकलिन फर्नांडिसला पत्र

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 09, 2023 12:29 PM IST

Sukesh Chandrashekhar- Jacqueline Fernandez: सुकेशने या पत्रातून जॅकलिनला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या असून अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

जॅकलिन
जॅकलिन

मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीच्या तिहार तुरुंगातून पुन्हा एकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सुकेशने या पत्रात जॅकलिनला 'मेरी बेबी, मेरी बोमा' असे म्हटले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्याने जॅकलिनला इस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुकेशने पत्रात लिहिले की, 'जॅकलिन मेरी बेबी, मेरी बोमा. बेबी तुला इस्टरच्या शुभेच्छा. मला माहिती आहे हा तुझ्या आवडत्या सणांपैकी एक सण आहे. मला आजही तु ज्या प्रकारे इस्टर साजरा करायची ते लक्षात आहे. मला तुझी खूप आठवण येते. मला तुझ्यातील ते लहान मुल पाहायचे जे अंडे तोडून त्यामध्ये कँडी टाकायचे. तुला माहिती आहे का तू की सुंदर आणि गोड आहेस ते. या दुनियेत तुझ्या इतकी सुंदर कोणी नाही. आय लव्ह यू माय बेबी.'
वाचा: गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक; पुष्पा-२ मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर

सुकेशने तुरुंगातून हे दुसरे पत्र लिहिले आहे. पहिल्यांदा त्याने होळीच्या शुभेच्छा देताना जॅकलिनला पत्र लिहिले होते. 'मी माझ्या जॅकलिनला माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत व्यक्तीला होळीच्या शुभेच्छा देतो. होळीच्या दिवशी अर्थात रंगांच्या या सणादिवशी मी तुला वचन देतो की, तुझ्या आयुष्यातून गायब झालेले सगळे रंग मी परत आणीन. मी वचन देतो आणि ही माझी जबाबदारीही आहे’ असे त्याने पत्रात लिहिले होते.

२०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत सुकेशचे संबंध होते. मात्र, जॅकलिनशिवाय नोरा फतेही आणि इतर अनेक अभिनेत्रींची नावेही त्याच्यासोबत जोडली गेली आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, सुकेशने जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर तब्बल १० कोटी रुपये खर्च केले आहेत आणि जॅकलिनला देखील महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुकेश जॅकलिनला मुंबईहून चेन्नईला बोलावण्यासाठी चार्टर्ड विमान पाठवत असे, ज्यावर सुमारे ८ कोटी रुपये खर्च झाले आहेत. तुरुंगात गेल्यानंतरही सुकेश बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवत होता.

Whats_app_banner