मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suhani Bhatnagar Death: ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन; १९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Suhani Bhatnagar Death: ‘दंगल’ फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचं निधन; १९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 17, 2024 02:52 PM IST

Suhani Bhatnagar Passes Away: सुहानी भटनागर अवघ्या १९ वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता.

Suhani Bhatnagar Passes Away
Suhani Bhatnagar Passes Away

Suhani Bhatnagar Passes Away: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा सुपरहिट चित्रपट 'दंगल'मध्ये बबिता फोगट हिच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन झाले. सुहानी भटनागर अवघ्या १९ वर्षांची होती. काही दिवसांपूर्वी सुहानीचा अपघात झाला होता. या अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांदरम्यान तिला देण्यात आलेल्या औषधांमुळे तिच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला होता. या प्रतिक्रियेमुळे सुहानीच्या शरीरात पाणी साठू लागले होते. यामुळे तिला दिल्लीतील एम्स रुग्णालयात बराच काळ दाखल करण्यात आले होते.

सुहानी भटनागर हिच्यावर उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याने आता मनोरंजन विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टरांनी सुहानीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तिचा जीव वाचू शकला नाही. १७ फेब्रुवारी रोजी सुहानी भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला. सुहानी भटनागरच्या निधनामुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या आई-वडिलांची अवस्था देखील वाईट झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सुहानी तिच्या कुटुंबासोबत फरीदाबादमध्ये राहत होती. शनिवारी सकाळी उपचारांदरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. अजरोंदा येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Prajakta Mali: ‘भक्षक’ पहिल्यानंतर प्राजक्ता माळीने दिली बालिकाश्रमाला भेट! पोस्ट लिहित चाहत्यांना केलं आवाहन

‘दंगल’ चित्रपटातून केले होते पदार्पण

अभिनेत्री सुहानी भटनागर हिने २०१६मध्ये आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजन विश्व गाजवले होते. चाहते तिच्या कमबॅकची आतुरतेने वाट बघत होते. सुहानी भटनागर हिला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती. बॉलिवूड पदार्पणापूर्वी तिने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले होते. 'दंगल' चित्रपटातील तिची छोटीशी भूमिका आणि तिचे कामही प्रेक्षकांना खूप आवडले होते. ‘दंगल’ चित्रपटातील तिच्या डायलॉग्सनी प्रेक्षकांना भरपूर हसवले होते. मात्र, इतक्या कमी वयात तिने जगाचा निरोप घेतल्याने आता मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

नितेश तिवारी यांचा ‘दंगल’ हा चित्रपट २०१६मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता आमिर खान याने कुस्तीपटू महावीर सिंह फोगट यांची भूमिका साकारली होती. तर, अभिनेत्री साक्षी तन्वर हिने त्यांच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.

IPL_Entry_Point