Viral Video: इंटरनेटवर सुहानाचीच हवा... शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: इंटरनेटवर सुहानाचीच हवा... शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!

Viral Video: इंटरनेटवर सुहानाचीच हवा... शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!

Published Mar 18, 2024 10:29 AM IST

Suhana Khan Viral Video: अभिनेत्री सुहाना खानचा बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!
शाहरुख खानच्या लेकीनं शेअर केला बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा व्हिडीओ!

Suhana Khan Viral Video: बॉलिवूडचा ‘बादशाह’ अर्थात अभिनेता शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सुहाना खान हिने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आता मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुहाना खान हिचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर आता सुहाना खान तिच्या प्रत्येक कृतीमुळे चर्चेत येते. जेव्हापासून सुहानाने पदार्पण केले आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा सुरू असतात. अगदी सुहाना काय कपडे परिधान करते इथपासून ते ती कधी आणि कोणासोबत दिसते, यावरही चाहते बारीक लक्ष ठेवून असतात. या सगळ्यादरम्यान, सुहानाचा बाथटबमध्ये अंघोळ करतानाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सुहाना खान हिने स्वतः तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर आग लावणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना बाथटबमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. सुहाना खानची ही स्टाईल पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत. सुहाना खानचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेट विश्वात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ जरी बोल्ड असला, तरी या व्हिडीओमध्ये सुहाना खान खूपच निरागस दिसत आहे.

Neena Kulkarni Serial: छोट्या पडद्यावर पुन्हा एका नव्या मालिकेची एंट्री! नीना कुळकर्णींचं धमाकेदार कमबॅक

सुहानाला पाहून चाहते वेडावले!

सुहाना खानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही चाहते तिला ‘ड्रीम गर्ल’ म्हणत आहेत. बाथटबमध्ये आंघोळ करतानाचा सुहानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार शेअर केला जात आहे. सुहानाचा हा सेन्शुअल अवतार पहिल्यानंतर ती शाहरुख खानप्रमाणेच प्रचंड लोकप्रियता मिळवेल, असे तिचे चाहते म्हणत आहेत. काहींनी तिला ‘अगदी वडिलांची सावली’ म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडीओवर सुहानाचे जगभरातील चाहते भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर, या व्हिडीओवर लाईक्सचा देखील पाऊस पडत आहे.

Elvish Yadav News: चौकशीत एल्विश यादव सहकार्य करेना! पोलिसांपासून मोठी माहिती लपवत असल्याचा संशय

सुहाना गाजवणार मनोरंजन विश्व!

शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. सुहाना खान हिने तिच्या ‘द आर्चिज’ या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. झोया अख्तर हिने दिग्दर्शित केलेल्या ‘द आर्चिज’ या चित्रपटात सुहाना खानसोबत, अभिनेत्री खुशी कपूर आणि अभिनेता अगस्त्य नंदा हे स्टारकिड्स देखील मुख्य भूमिकेत झळकले होते.

Whats_app_banner