छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांसाठी नेहमीच करमणूकीचे साधन ठरत असतात. तसेच या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचताना दिसतात. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी करिअरची सुरुवात ही छोट्या पडद्यापासून केली आहे. त्यामध्ये प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि इतर काही कलाकारांचा समावेश आहे. अभिनेता सुबोध भावे देखील 'तुला पाहाते रे' या मालिकेत काम करताना दिसला होता. आता सुबोध पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
अभिनेता सुबोध भावेची 'तुला पाहाते रे' ही मालिका तुफान हिट ठरली होती. त्यानंतर आता पुन्हा त्याची नवी मालिका येत आहे. या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुबोध सोबत या मालिकेत ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सुबोध आणि शिवानीला एकत्र पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
वाचा: गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार
सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक नुकताच प्रदर्शित करण्यात आली. या मालिकेचा थोडा हटके प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार
‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये २५ वर्षांपूर्वीच्या कॉलेजमधील आठवणी जाग्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुबोध भावे हा अतिशय तरुण दिसत आहे. तो माही या तरुण मुलाच्या भूमिकेत ही दिसणार आहे आणि एका शिक्षकाच्याही. हा प्रोमो शेअर करत वाहिनीने “नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची! कारण, ‘जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे. अनेकांनी सुबोध आणि शिवानीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. ही मालिका कधी सुरु होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वाचा: गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या