Subhash Ghai Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांचा आज (२४ जानेवारी) वाढदिवस आहे. सुभाष घई यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील दिल्लीत दंतवैद्य होते. सुभाष यांनी सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतून पूर्ण केले. यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रवेश घेतला. यानंतर ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. दरम्यान, त्यांनी पत्नी मुक्तासोबत लग्न केले आणि त्यांना मेघना घई आणि मुस्कान घई या दोन मुली झाल्या. सुभाई घई यांनी पत्नी मुक्ताच्या नावाने 'मुक्ता आर्ट्स' नावाचे प्रोडक्शन हाऊसही सुरू केले.
बॉलिवूडचे 'शोमॅन' सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. अभिनेता होण्यासाठी ते मुंबईत आले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम केले. 'उमंग' आणि 'गुमराह' या चित्रपटांमध्ये ते मुख्य भूमिकेत दिसले होते. अभिनय क्षेत्रात हीरो म्हणून आपला प्रवास सोपा वाटेना, तेव्हा त्याने दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. यामुळेच त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातील एका दृश्यासाठी स्वतः कॅमेऱ्यासमोर जाण्याचा निर्णय घेतला.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सलमानने सांगितले होते की, त्याने आयुष्यात एका व्यक्तीशिवाय कोणावरही हात उचलला नाही आणि ती व्यक्ती म्हणजे सुभाई घई. सलमानने सांगितले हा किस्सा सांगताना म्हटले होते की, एकदा त्याचे सुभाष घई यांच्याशी काही मुद्द्यावरून मतभेद झाले होते. आणि रागाच्या भरात सुभाषने सलमानची कॉलर पकडून त्याच्यावर चमचा फेकून मारला होता. यावर सलमानही संतापला होता आणि त्याने सुभाष घई यांना थप्पड मारली होती. मात्र, या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सलमानने त्यांच्याकडे जाऊन माफी मागितली होती. तर आपलं मन मोठं करून सुभाष घई म्हणाले की, ही केवळ एक वाईट घटना म्हणून आपण विसरून गेलो पाहिजे.
सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'कालीचरण' या चित्रपटातून केली होती. सुभाष घई यांचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला. यानंतर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांनी अभिनेते दिलीप कुमारसोबत अनेक चित्रपट दिग्दर्शित केले, ज्यात 'विधाता', 'सौदागर', 'कर्म' सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. एवढेच नाही तर 'कर्मा' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संबंधित बातम्या