बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा 'स्त्री २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे रेकॉर्ड केले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या चित्रपटांना देखील मागे टाकले आहे. आता 'स्त्री २' चित्रपटाविषयी एक माहिती समोर येत आहे. राज कुमाररावमुळे अभिषेक बॅनर्जीला चित्रपटाचे बजेट हे २५ लाख रुपयांनी वाढवावे लागले होते. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...
'स्त्री २' या चित्रपटात अभिषेक बॅनर्जीनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, पटकथेतील राजकुमार रावचे इम्प्रोव्हायझेशन ही आपली चूक कशी सिद्ध झाली. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट १०० कोटींच्या जवळपास असल्याचे सांगितले जात आहे, पण तुम्हाला माहित आहे का की हे बजेट वाढण्यापासून रोखता आले असते.
राजकुमार रावच्या पटकथेतील छोट्याशा बदलासाठी निर्मात्यांना २५ लाख रुपये मोजावे लागले. अभिषेक बॅनर्जीने फीव्हर एफएमशी बोलताना सांगितले की, राजकुमार रावने पटकथेत बदल करताना आपल्या संवादांमध्ये रेमाचे सुपरहिट गाणे 'कम डाऊन' जोडले होते. विशेषत: तो 'लो लो लो लो लो' भाग. या अनियोजित सुधारणेसाठी निर्मात्यांना इतका खर्च आला की त्यांना म्युझिक राइट्ससाठी २५ लाख रुपये मोजावे लागले. अभिषेक बॅनर्जी यांनी हसून याला 'इतिहासातील सर्वात महागडा इम्प्रोव्हायझेशन' असे संबोधले.
अभिषेक बॅनर्जी यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, स्त्रीच्या पहिल्या भागाचा वारसा पुढे नेणे इतके सोपे नाही. अभिनेत्याने सांगितले की, त्याच्यासमोर हे एक मोठे आव्हान होते. हा चित्रपट हिट होईल, असे त्यांनाही वाटत होते, पण ज्या प्रकारे एकतर्फी यश मिळत आहे, ते खरोखरच कुणाच्याही अंदाजाच्या पलीकडचे आहे, असे या अभिनेत्याने सांगितले.
वाचा: 'मला पैसा, ड्रग्ज आणि महिलांचे व्यसन लागले होते', प्रसिद्ध रॅपरचा धक्कादायक खुलासा
चित्रपटाची कथा 'चंदेरी' नावाच्या एका खेड्याची आहे जिथे लोकांना एका भूताने त्रास दिला आहे जो नवीन असलेल्या आणि निर्बंधांच्या पलीकडे स्वतःच्या मार्गाने जीवन जगायला आवडणाऱ्या मुलींना पळवून नेतो. गावातील एक छोटा टेलर (राजकुमार राव) आपल्या काही मित्रांसोबत ही समस्या हाताळण्याचा निर्णय घेतो. मग ते ही समस्या कशी सोडवतात आणि या दरम्यान त्यांना कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहावा लागेल.