Stree 2 OTT: ओटीटीवर 'स्त्री २' सिनेमा पाहाण्यासाठी मोजावे लागणार वेगळे पैसे, काय आहे भानगड वाचा-stree 2 is released on amazon prime video ott but we need to pay money for movie ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Stree 2 OTT: ओटीटीवर 'स्त्री २' सिनेमा पाहाण्यासाठी मोजावे लागणार वेगळे पैसे, काय आहे भानगड वाचा

Stree 2 OTT: ओटीटीवर 'स्त्री २' सिनेमा पाहाण्यासाठी मोजावे लागणार वेगळे पैसे, काय आहे भानगड वाचा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 27, 2024 09:46 AM IST

Stree 2 OTT: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री २' आता चित्रपटगृहांबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Stree 2 OTT
Stree 2 OTT

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील 'स्त्री २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ४३ दिवस झाले असले तरीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ६०८.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. पण प्रेक्षकांना ओटीटीवर पाहण्यासाठी सब्सक्रिप्शन शिवाय पैसे मोजावे लागणार आहेत.

ओटीटीवर येणार स्त्री २

एकीकडे ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'स्त्री १' स्ट्रीमिंग होत आहे. तर दुसरीकडे ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'स्त्री २' रिलीज करण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर विनामूल्य स्ट्रीमिंग होणार नाही. ओटीटीवर 'स्त्री २' पाहण्यासाठी प्रेक्षकांना आधी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ सब्सक्राइब करावे लागणार आहे. त्यानंतर स्त्री २ पाहायला वेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.

'स्त्री २'ची किंमत किती?

'स्त्री २' हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. सबस्क्राइब केल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटासाठी ३४९ रुपये मोजावे लागणार आहेत. हा चित्रपट खरेदी केल्यावर प्रेक्षकांना ३० दिवसांच्या आत हा चित्रपट पाहावा लागणार आहे. मात्र जेव्हा तुम्ही हा चित्रपट सुरू कराल तेव्हा हा चित्रपट पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ४८ तास असतील.

किती केली कमाई

चित्रपटाच्या जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सॅनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'स्त्री २'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवरून ८२६.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतीय बॉक्स ऑफिसवर ६०८.३७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: राजकुमार रावच्या एका चुकीमुळे 'स्त्री २' सिनेमाचे वाढवावे लागले बजेट, नेमकं काय घडलं?

या चित्रपटासाठी किती खर्च आला?

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर उभे ठाकले असताना, हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ने हा करिष्मा केला आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २० ते २५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. तर, दुसरा भाग बनवण्याचा खर्च सुमारे ३० ते ४० कोटींच्या आसपास आहे. या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, निर्मात्यांनी पहिल्या चित्रपटातून १८० कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘स्त्री २’चे एकूण वर्ल्डवाइड कलेक्शन किती होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या या चित्रपटाची सुरुवात जोरदार झाली आहे.

Whats_app_banner
विभाग