'स्त्री २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटाने गुरुवारी ५५.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'स्त्री २'ने पहिल्याच दिवशी ५५ कोटींचा टप्पा ओलांडून पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. हे पाच चित्रपट कोणते? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. चला तर मग जाणून घेऊया या पाच ब्लॉकबस्टर चित्रपटांविषयी...
'स्त्री २' चित्रपटाने बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या 'पठाण', अभिनेता रणबीर कपूरच्या 'अॅनिमल', दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'केजीएफ २', अभिनेता हृतिक रोशनच्या 'वॉर' आणि अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया २' या चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. 'स्त्री २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'पठाण' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ५५ कोटी रुपये, 'अॅनिमल' चित्रपटाने ५४.७५ कोटी रुपये, साऊथ चित्रपट 'केजीएफ २' (हिंदी)ने ५३.९५ कोटी रुपये, 'वॉर' चित्रपटाने ५१.६० कोटी रुपये आणि 'भूल भुलैया २' या चित्रपटाने १४.११ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
'स्त्री २'ने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला मागे टाकले असले, तरी त्याच्या 'जवान' चित्रपटाला पराभूत करता आले नाही. तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्त्री २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने ओपनिंग डेला ६५.५० कोटी रुपयांची कमाई केली.
Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू
जिथं २०१८ सालचे स्त्रीचे वर्ष संपले आहे, तिथूनच स्त्री २ ची सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी चंदेरी गावातील नागरिकांची स्त्री पासून तर सुटका झाली आहे पण 'सिरकाटे'ची नवी दहशत निर्माण झाली आहे. गावकरी स्वत:चे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय करताना दिसत आहेत. गेल्यावेळी स्त्री ही सर्वांना त्रास देत होती. यावेळी सिरकाटे हे भूत सर्वांना त्रास देत आहे.
'स्त्री २' प्रदर्शित झाल्यानंतर आता लोक 'स्त्री ३'ची वाट पाहत आहेत. चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान यांनी दिल्लीत 'स्त्री २'च्या पत्रकार परिषदेत 'स्त्री ३'ची कथा लिहिल्याची माहिती दिली होती. मात्र हा चित्रपट तीन वर्षांनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता सर्वजण तिसऱ्या भागाची वाट पाहात आहेत.