Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?-stree 2 box office collection day 1 how much did shraddha kapoor and rajkumar rao s movie earn ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?

Stree 2 Collection: ‘स्त्री २’ला मिळाली जबरदस्त ओपनिंग! श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या चित्रपटाने किती कमावले?

Aug 16, 2024 08:39 AM IST

Stree 2 Collection Day 1:श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री २' या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. जाणून घेऊया किती गल्ला जमवला...

स्त्री 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
स्त्री 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन

Stree 2 Box Office Collection Day 1: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मानकाप्या म्हणजेच ‘सिरकट्या’'ची दहशत लोकांना इतकी आवडली आहे की, ‘स्त्री २’ हा चित्रपटात वर्षातील सर्वात मोठा ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आजे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ५४.३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांचा दमदार अभिनय असणाऱ्या ‘स्त्री २’ या चित्रपटाने बुधवारी विशेष ओपनिंग प्रीमिअरमध्ये ८ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर १५ ऑगस्टला या चित्रपटाने तब्बल ४६ कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे ‘स्त्री २’ या चित्रपटाने ५४.३५ कोटींची कमाई करत धमाकेदार ओपनिंग मिळवली आहे.

अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून, २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ‘स्त्री २’ या चित्रपटाची सुरुवात देखील चंदेरी गावापासून होते. ‘स्त्री २’ हा चित्रपट पाहणारा प्रत्येकजण या कथेत ‘स्त्री’ची म्हणजेच श्रद्धा कपूरची वाट पाहत आहे. तीच येऊन चंदेरीतील महिलांना सिरकाटेच्या दहशतीपासून वाचवू शकते. या चित्रपटात प्रेक्षकांसाठी काही सरप्राईजही आहेत. या चित्रपटात वरुण धवनचा कॅमिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Stree 2 Review: हॉरर आणि कॉमेडीचा डबल डोस! तिकिट बूक करण्यापूर्वी वाचा 'स्त्री २'चा रिव्ह्यू

कशी आहे इतर चित्रपटांची अवस्था?

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री २’सोबतच अक्षय कुमार, तापसी पन्नूचा ‘खेल-खेल में’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ हे चित्रपटही चित्रपटगृहात प्रदर्शित झाले आहेत. मात्र, या दोन्ही चित्रपटांना ६ ते ७ कोटींची ओपनिंग मिळाली आहे. ‘स्त्री २’च्या तुलनेत ही कमाई खूपच कमी आहे. दोन चित्रपटांसह प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’ची कमाई पाहता प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘स्त्री २’च्या रिव्ह्यूबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट तुम्हाला हसवण्यासोबतच घाबरवणारा देखील आहे. चित्रपटातील कलाकारांचा संवाद, पटकथा आणि अभिनय तुम्हाला नक्कीच आवडेल.