पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गल्ली बॉय'ची ऑस्करवारी, आनंद व्यक्त करण्यासाठी झोयाला शब्द अपुरे

झोया अख्तर

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'गली बॉय' चित्रपटाला भारताकडून ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय'ची 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या विभागासाठी निवड करण्यात आली आहे.  'गली बॉय'ला ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर दिग्दर्शिक झोया अख्तरचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. 

सलमानसोबतच्या नात्याविषयी कतरिना म्हणते...

'गली बॉय'ची निवड ऑस्करसाठी भारताकडून करण्यात आली आहे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे वर्ष माझ्यासाठी सर्वार्थानं खास ठरलं आहे. आमच्या कामाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद हा खरंच मनाला समाधान देणारा आहे.  काही दिवसांपूर्वी एमी पुरस्कारांसाठीही लस्ट स्टोरीजला नामांकन मिळालं होतं ही कामाची पोचपावती आहे असं झोया म्हणाली. 

ड्रिम गर्ल : 'ढगाला लागली कळ' गाणं हटवण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश

गल्ली बॉयमध्ये आलिया,  रणबीर सोबत कलकी कोचलीन अमृता सुभाष यांच्यादेखील प्रमुख भूमिका होत्या. ऑस्करसाठी नामांकन मिळाल्यानंतर आलिया, रणबीरबरोबरच अमृता सुभाषनं देखील आपला आनंद व्यक्त केला आहे.