पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत नव्या वेबीसीरिज

आणि काय हवं?

लॉकडाउनमुळे सर्व मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. मार्च महिन्यात मालिका, चित्रपट, वेबसीरिज, जाहिरातींचं  चित्रीकरण खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. मालिकांचे चित्रीकरण बंद असल्यानं मालिकांचे जुने भाग, जुन्या काही मालिकांचं पुनर्प्रक्षेपण आणि पूर्वीचे पुरस्कार सोहळे यांचं प्रक्षेपण सध्या वाहिन्यांवर होत आहे. 

बहिणीला पाठिंबा देणाऱ्या कंगनाविरोधात पोलिसात तक्रार

पण झी मराठी वाहिनी या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी काहीतरी नवीन सादर करणार आहे. नात्यानं नवी उमेद देणाऱ्या काही वेबसीरीज झी मराठीवर येत्या काही दिवसांत प्रसारित होणार आहेत. खाकी वर्दीतील आनंदी माणसाची गोष्ट 'पांडू' या सीरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जोडप्याच्या नात्यातला गोडवा असलेली एक गोड कथा प्रिया बापट आणि उमेश कामत 'आणि काय हवं..?' या वेबशोमधून प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. निपुण धर्माधिकारी याची 'वन्स अ इयर' ही वेब सीरीज प्रेमातल्या अविस्मरणीय क्षणाचा प्रवास प्रेक्षकांना घडवणार आहे. या सर्व नवीन कथा २७ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटाच्या यशानंतर 'रेड २' ही येणार

याबद्दल बोलताना झी मराठी वाहिनीचे व्यवसायप्रमुख निलेश मयेकर म्हणाले, "वेगळा प्रयोग करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या प्रयोगाला प्रेक्षकांची पसंती मिळाली तर भविष्यात लघुपट प्रसारित करण्याचा पर्यायही वाहिनीकडे आहे."