पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उजळ वर्णामुळे अभिनेत्रीला दिला चित्रपटासाठी नकार

झरिन खान

मनोरंजन विश्वात कलाकाराच्या अभिनयास महत्त्व असतं, मात्र अनेकदा अभिनयापेक्षा कलाकाराच्या दिसण्याला महत्त्व दिलं जातं. दिसण्यावरुन अनेक कलाकाराला भूमिका नाकारल्या जातात अशा अनेक घटना समोर आल्यात. खुद्द प्रियांका चोप्राला वर्णावरुन हॉलिवूड चित्रपट नाकारण्यात आला होता. अदीती राव हैदरीलाही याच कारणावरून एक परदेशी चित्रपट नाकारण्यात आला होता.

IIFA Awards 2019 : या कलाकारांनी उठवली आयफावर मोहर

आता असाच काहीसा प्रकार झरिन खानसोबतही घडला आहे. उजळ वर्णावरून तिला चित्रपट नाकारण्यात आला. झरिनला एका  चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं. यात झरिन खेडेगावातील महिलेच्या भूमिकेत होती. शेवटी तिला चित्रपटाच्या टीमकडून नकार कळवण्यात आला. 
'खेडेगावातल्या मुली या उजळ वर्णाच्या नसतात. तुझा वर्ण खूपच उजळ आहे, असं  शेवटच्या क्षणी  चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आलं.

मेट्रोला पाठिंबा देणाऱ्या बच्चन यांच्याविरोधात नाराजीचे सूर

खेडेगावातल्या मुलींबद्दल लोकांच्या मनात किती गैरसमज आहेत. लोकांची मानसिकता अजूनही वर्णद्वेषी आहे याचंच राहून राहून मला आश्चर्य वाटतं', असंही झरिन म्हणाली.