पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दंगल गर्ल' झायरा वसीमची 'या' कारणामुळे अभिनयातून 'एक्झिट'

झायरा वसीम (IANS)

'दंगल गर्ल' झायरा वसीमने कमी वयात आणि कमी कालावधीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ती सोनाली बोसचा चित्रपट 'द स्काय इज पिंक' यात दिसणार आहे. परंतु, सोशल मीडियावरील तिच्या एका पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. झायरा वसीमने अभिनय सोडण्याची घोषणा केली आहे. 

झायराने म्हटले आहे की, बॉलिवूडमध्ये येऊन मला ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे माझे आयुष्यच बदलून गेले. मला प्रसिद्धी आणि लोकांचे प्रेम मिळाले. भलेही मी इथे पात्र ठरली असली तरी मी इथली नाही. हे माझ्या इमानपासून मला दूर करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

तिने सोशल मीडियावर सहा पानांचे पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने कुराणचा उल्लेखही केला आहे. हा मार्ग मला अल्लाहपासून दूर करत आहे. 

दरम्यान, झायराने कोणाच्या तरी दबावाखाली ही पोस्ट लिहिल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. द स्काय इज पिंक या चित्रपटाचे चित्रीकरण संपले आहे. या चित्रपटात झायरा वसीमशिवाय प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांचीही भूमिका आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Zaira Wasim quits Bollywood says it led her to a path of ignorance as she unconsciously transitioned out of imaan