पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झायरा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनपासूनही दूर राहणार

प्रियांका आणि झायरा वसीम यांच्या चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड 'एक्झिट' संदर्भात सोशल मीडियावरु केलेल्या एका पोस्टमुळे अभिनेत्री झायरा वसीम सध्या चर्चेत आहे. 'दंगल' फेम झायराने बॉलिवूड सोडण्याचा निर्धार सोशल माध्यमातून व्यक्त केला होता. आपल्या या निर्णयात तिने धर्माचा उल्लेख केल्यामुळे तिच्या एक्झिटच्या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. काहींनी तिच्यावर टीका केली तर काही तिचे समर्थन करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.   

'दंगल' आणि 'सीक्रेट स्टार' या सारख्या गाजलेल्या चित्रपटातील अभिनयानंतर झायरा 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात झायरा दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये झायरा दिसणार नसल्याचे वृत्त आहे.

झायरानं कदाचित दबावामुळे निर्णय घेतला असेन - अनुपम खेर

'मिड डे' च्या वृत्तानुसार, बॉलिवूडध्ये काम करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर झायराने 'द स्काय इज पिंक'च्या निर्मात्यांना प्रमोशनमध्ये सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. पण झायरा यापासून दूर राहणार आहे.  

'द स्काय इज पिंक' या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. चित्रपटाचे शुटिंग संपल्यानंतर या चित्रपटातील टीमने धमाकेदार पार्टी केली होती. पार्टी फोटोशूटला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाल्याचेही पाहायला मिळाले होते. 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेरणादायी वक्ता ( मोटिवेशनल स्पीकर) आयेशा यांच्या जीवनावर आधारित आहे. झायरा व्यतिरिक्त या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.  

माझं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलं नाही : झायरा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: zaira wasim may not promot priyanka chopra starrer film sky is pink lets check repot and watch video