पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हार्दिकच्या पार्टनरबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

नताशा स्टेनकोविच

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याने नताशासोबत साखरपुडा केल्याचे जाहीर केले आहे. या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.  नताशा स्टेनकोविच हिचा जन्म सर्बियामध्ये झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिने नृत्य कला आत्मसाद करण्यास सुरुवात केली. वयाच्या १७ व्या वर्षी तिने मॉडर्न स्कूल ऑफ बेलेमध्ये प्रवेश घेतला. 

मै तेरा, तू मेरी जाने सारा हिंदुस्थान म्हणत पांड्या झाला #engaged

२०१० मध्ये मिस स्पोर्ट्स सर्बिया हा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनय आणि नृत्य क्षेत्रात काम करण्याचे तिने पक्के केले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. 'सत्याग्रह' या चित्रपटातील 'हमरी अटिरिया में..' या आयटम साँगमध्ये ती थिरकताना दिसली.  या गाण्यामुळे चर्चेत आलेल्या नताशाला बिग बॉसने खरी ओळख दिली. सलमान खानच्या लोकप्रिय कार्यक्रम असलेल्या बिग बॉसच्या आठव्या सिझनमध्ये नताशा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. अर्जुन रामपालच्या 'डॅडी' या चित्रपटातही नताशाने आयटम साँग केले आहे. 'फुकरे रिटर्न्स' मधील तिच  'ओ मेरी मेहबूबा' हे गाणही चांगलच गाजल होते. 

2020: वर्षभरात विवाह मुहूर्ताचा धडाका; पहा संपूर्ण यादी

हार्दिकच्या २६ व्या वाढदिवसाला नताशा स्टेनकोविचने इन्स्टाग्रामवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. चांगल्या मित्राला मजबूत आणि सुंदर व्यक्तीला खूप खूप शुभेच्छा! या शब्दांमुळे दोघांच्या नात्यासंदर्भात चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.