पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्जुनसोबत फोटो पोस्ट केल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर मलायका म्हणते...

मलायका- अर्जुन

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याची खूपच चर्चा आहे. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली. मलायकानं अर्जुनसोबतचं नातं मान्य केलं. या दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर आहे त्यामुळे अनेकदा ते दोघंही ट्रोलिंगचा विषय ठरतात.

चीननंतर आता दक्षिण कोरियात प्रदर्शित होणार ‘अंधाधून’

मलायका किंवा अर्जुननं एकत्र फोटो शेअर केले की अनेकदा त्या दोघांनाही ट्रोल केलं जातं. यावर मलायकानं दुर्लक्ष करणं पसंत केलं आहे. तुम्ही  लोकांना अडवू शकत नाही कारण ती त्यांची वैयक्तिक मतं आहेत, असं मलायका म्हणाली.

प्रियांकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकची मागणी युनिसेफनं फेटाळली

काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान टाइम्स ब्रंचला  दिलेल्या मुलाखतीत मलायकानं वाढत्या ट्रोलिंगवर नाराजी व्यक्त केली होती. 'प्रेमाला वयाचं बंधन कधीही नसतं. जेव्हा तुमचं मन आणि विचार एकमेकांशी जोडले जातात त्यावेळी वयाचा मुद्दा अतिशय गौण ठरतो. मात्र दुर्दैवानं आपल्या समाजात हा बदल मान्य नाही. वयानं मोठा पुरुष जोडीदार तरुण मुलीनं निवडला तर काहीच हरकत नसते. वयानं मोठा पुरुष जोडीदार चालतो. मात्र जर स्त्रीनं वयानं लहान जोडीदार निवडला तर तिला म्हातारी म्हणून हिणवलं जातं. मात्र अशा संकुचित विचारांच्या लोकांचा मला फार फरक पडत नाही'  असं ती म्हणाली होती.