पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाचा 'छपाक' वादात, स्वामित्त्व हक्क भंग केल्याचा आरोप

छपाक

चित्रपट निर्माते राकेश भारती यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि दिग्दर्शिका मेघना गुलजारविरोधात  स्वामित्त्व हक्क भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दीपिका आणि मेघना यांनी स्वामित्त्व हक्काच अल्लंघन केलं असून त्यांच्याविरोधात कडक पाऊल उलचण्याची विनंती कोर्टाला भारती यांनी केली आहे. 

''अॅसिड हल्ल्यातील पीडितीवर प्रेरणा घेऊन चित्रपट काढण्याची कल्पना मला सुचली होती. मी चित्रपटाची कथाही लिहिली होती. मे २०१५ मध्ये 'ब्लॅक डे' या नावानं  चित्रपटाची अधिकृत नोंदणीही मी केली होती'', असा दावा भारती यांनी केला आहे. या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन, कंगना राणौत सारख्या मोठ्या कलाकारांना देखील विचारलं होतं, तसेच चित्रपटाच्या निर्मितीसाठी फॉक्स स्टार स्डुडिओकडेही बोलणी केल्याचा दावा भारती यांचा आहे. 

जयंती विशेष : संगीत रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारा नाटककार

या चित्रपटाची स्क्रीप्ट  फॉक्स स्टार स्डुडिओ,  का प्रोडक्शन आणि मृग फिल्मच्या ऑफिसमध्ये प्रपोजल म्हणून ठेवण्यात आली होती. या निर्मितीसंस्थांनी चित्रपटाची निर्मिती करण्यात रस दाखवला होता. मात्र हाच विषय घेऊन नवीन चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. त्यांनी लिहिलेल्या कथेत काही बदल केले असल्याचंही भारती यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

'छपाक' हा चित्रपट फॉक्स स्टार स्डुडिओ, मृग फिल्म आणि दीपिका पादुकोनच्या का प्रोडक्शनच्या सहनिर्मितीतून तयार करण्यात आला आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

'गूड न्यूज'! परदेशातही चित्रपटाची बक्कळ कमाई