पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

World Emoji Day 2019 : हा आहे सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी

वर्ल्ड इमोजी डे

टेक्स मेसेजद्वारे संवाद साधताना शब्दांइतकंच महत्त्व हे Emoji इमोजीला आहे. त्यामुळे आजच्या घडीला  इमोजीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. इमोजीमुळे संवाद अधिक सहज होतो, समोरच्या व्यक्तींच्या भावना या पटकन कळतात म्हणूनच सर्वांची पसंती ही इमोजीला असते.  इमोजीद्वारे अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होता येते यावर बहुतेक सर्वांचं एकमत असेन. 

दरवर्षी १७ जुलै हा दिवस World Emoji Day  म्हणून साजरा केला जातो.  २०१०  पासून खऱ्या अर्थानं इमोजी  वापरायला सुरूवात झाली. संवाद साधताना सर्वाधिक इमोजी वापरणाऱ्या युजर्समध्ये भारतीयांचा समावेशदेखील आहे. तेव्हा आजच्या 'वर्ल्ड इमोजी डे' निमित्तानं आपण भारतात आणि जगभरात सर्वाधिक लोकप्रिय इमोजी कोणता ते पाहणार आहोत. 

इमोजी ट्रॅकर या ऑनलाइन पोर्टलच्या माहितीनुसार ट्विटरवर सर्वाधिक ‘tears of joy’ हा इमोजी वापरला जातो. आसू आणि हासू या दोन्ही भावना एकत्र दर्शवणारा हा इमोजी जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इमोजीच्या यादीत ‘tears of joy’ अव्वल स्थानी आहे. तर ‘blowing a kiss’ हा इमोजी भारतात सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी आहे. 

tears of joy

ठराविक महिन्यानंतर काही नवे इमोजी इमोजी लिस्टमध्ये अॅड केले जातात. या इमोजी आणि त्यांच्या अर्थाबद्दलची माहिती इमोजीपीडिया या  ट्विटर अकाऊंटवर युजर्सनां मिळते.