पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्यवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

गणेश आचार्य

नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यविरोधात एका महिलेनं राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. ९० च्या दशकात गणेश आचार्यनं  लैंगिक अत्याचार केले असा दावा या महिलेनं केला आहे. याआधी एका महिला सहाय्यक डान्सरनं गणेश आचार्य विरोधात तक्रार  दाखल केली होती. 

''तीस वर्षांपूर्वी गणेश आचार्यनं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते. आता माझं लग्न झालं आहे, मला मुलंही आहेत मात्र त्याच्या वर्तनात जराही बदल झालेला नाही.  १९९० मध्ये मी नृत्याच्या सरावासाठी अंधेरी पश्चिम येथे असलेल्या साहिबा हॉलमध्ये जायचे. त्यावेळी मास्टर कमल यांच्या हाताखाली आचार्य काम करायचा. मी केवळ १८ वर्षांचे होते आणि नॉन- मेंबर डान्सर होते.'', असं ही महिला मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. 

रजनीकांतच्या 'दरबार'मुळे मोठा तोटा, वितरकांचं उपोषण

 ''डान्सरनं डान्समधले काही प्रकार शिकणं अत्यावश्यक आहे असं सांगत त्यानं मला  सांताक्रूझमधल्या डान्स क्लासमध्ये प्रशिक्षणासाठी येण्याची विनंती केली. रविवारी ११ वाजता तिथे डान्स क्लास सुरु असायचे. त्याचा सहाय्यक मला नेण्यासाठी आला, त्यानं मला खारमधल्या एका हॉटेलच्या दारात सोडलं. तोपर्यंत मला कोणतीही शंका आली नाही. तिथे एकही विद्यार्थी नव्हता. सहाय्यक दीलिप डान्ससाठी साऊंड सिस्टम आणायला गेला आहे असं त्यानं मला सांगितलं. मग डान्स शिकवण्याच्या बहाण्यानं तो माझे  चुंबन घेऊ लागला'', असं देखील या महिलेनं सांगितलं.

'स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

''तो माझ्या शरीरास चुकीचा स्पर्श करत होता. माझ्याशी लग्न करायचं आहे असं सांगून तो शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत होता, मी कारण सांगून वेळ मारून नेली, तेव्हा त्यानं मला ऐकवलं होतं'' असं देखील ही महिला मुलाखतीत म्हणाली.  सरोज खान, तनुश्री दत्ता आणि दोन महिलांच्या आरोपांमुळे गणेश आचार्यच्या अडचणीत वाढ झाली आहे.  माझ्या विरोधात हा कट रचण्यात आला  आहे, अशी प्रतिक्रिया गणेश आचार्यनं गेल्या आठवड्यात दिली होती. 

तत्ताड : संगीतमय प्रेमकथेचा मनाला स्पर्श करणारा ट्रेलर