पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नच बलिये'च्या विजेत्या जोडीला 'दबंग ३'च्या गाण्यात झळकण्याची संधी

सलमान खान

सलमानसोबत काम करावं अशी अनेकांची इच्छा असते, सलमान हा बॉलिवूडमधल्या अनेक कालाकारांचा 'गॉडफादर' म्हणूनही ओळखला जातो.  त्यानं अनेक बॉलिवूड कलाकारांना संधी दिल्या आहेत. सलमान आता  'नच बलिये'च्या विजेत्यांना चित्रपटातील एका गाण्यात झळकण्याची संधी देणार आहे. 

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका

मुंबई मिररच्या वृत्तानुसार 'नच बलिये'च्या विजेत्यांना 'दबंग ३' मधल्या एका गाण्यात झळकण्याची संधी मिळणार आहे. 'नच बलिये ९' च्या विजेत्या जोडीवर  'दबंग'मधलं एक गाणं चित्रीत करण्यात येणार आहे. सलमान हा 'नच बलिये ९' चा निर्माता आहे. त्याचप्रमाणे या शोची संकल्पनाही सलमानचीच आहे. सलमाननं पूर्वीच आपली कल्पना टीमला सांगितली होती. त्यामुळे आता सलमानसोबत 'दबंग'मधल्या गाण्यात झळकण्याची संधी कोणत्या जोडप्याला मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

प्रियांका आणि निकचा नव्या घरासाठी शोध

सप्टेंबर अखेरपर्यंत 'दबंग ३' चं चित्रीकरण पूर्ण होणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर 'नच बलिये'च्या विजेत्या जोडीसोबत नोव्हेंबर महिन्यात गाणं चित्रीत होणार आहे.