पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : कोण होणार कॅप्टन अभिजित की रुपाली?

रुपाली भोसले

बिग बॉस मराठीच्या घरातील नाती आता सातव्या आठवड्यामध्ये बरीच बदलताना दिसत आहेत. घरातील जी सदस्य एकमेकांच्या पाठीमागे त्यांना नाव ठेवत होती, त्यांच्याबद्दल बरंच काही वाईट बोलत होते, ज्यांना घरातून कसं बाहेर काढता येईल याबद्दल प्लनिंग करत होते. तेच आता एकमेकांशी बोलताना, मज्जा मस्ती करताना दिसत आहेत. 

घरासाठी दुप्पट किंमत मोजणाऱ्यांपैकी मी नव्हे - तमन्ना

अतिथी देवो भव: या टास्कमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे दोन्ही टीममधील एका सदस्याला कॅप्टन होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी कॅप्टनसीची उमेदवारी कुठल्या दोन सदस्यांना द्यावी हे टीमने सर्वानुमते ठरवायचे आहे असे बिग बॉसनी सदस्यांना सांगितले. सर्वानुमते रुपाली आणि अभिजीत केळकर ही दोन नावे पुढे आली आणि यांच्यामध्येच आज कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे.
रुपाली आणि अभिजीतमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या कार्यामध्ये विरुध्द टीमच्या उमेदवाराला फोन ठेवण्यास भाग पाडायचे आहे.  या टास्कमध्ये कोण बाजी मारणार? घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान कोणाला मिळणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.