पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तर आज 'जब वी मेट'मध्ये शाहिदऐवजी दिसला असता हा अभिनेता

जब वी मेट

इम्तिआज अलीचा 'जब वी मेट' चित्रपट बॉलिवूडमधल्या सुपरडुपर हिट चित्रपटांपैकी  एक ठरला. या चित्रपटानं करिना कपूर आणि  शाहिदच्या करिअरला कलाटणी दिली. करिना- शाहिद म्हणजे एकेकाळची बॉलिवूडची रिल नाही तर रिअल लाइफही रोमँटीक जोडी होती.  मात्र 'जब वी मेट'मध्ये शाहीद कपूर नाही तर बॉबी देओलची मुख्य अभिनेता म्हणून  निवड करण्यात आली होती. २०१७ मध्ये एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बॉबीनं हे गुपित फोडलं.

सूडानं पेटलेल्या 'बेगम'ची गोष्ट

इम्तिआज अलीकडे स्क्रिप्ट होती, मात्र करिना काही कारणामुळे त्याला भेटायला तयार नव्हती. त्यामुळे बॉबीनं चित्रपटासाठी प्रिटी झिंटाचं नाव सुचवलं. प्रिटी 'जब वी मेट' करण्यासाठी तयार झाली तेव्हा या चित्रपटाचं नाव 'गीत' असं ठरलं होतं. मात्र प्रिटीनं सहा महिन्यानंतर चित्रीकरण करण्याची अट ठेवली.

अभिनेता अर्जुन कपूर अशी करणार मदत

या काळात करिना कपूर चित्रपट तयार करण्यासाठी तयार झाली. आश्चर्य म्हणजे इम्तिआज अलीनं बॉबीऐवजी शाहिदची या चित्रपटासाठी निवड केली. 'हायवे'मध्येदेखील बॉबीची निवड करण्यात आली होती, मात्र तेव्हाही  बॉबीचा इम्तिआज अलीसोबत काम करण्याचा योग जुळून आला नव्हता.