पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमचं व्हॉट्स अ‍ॅप अपडेट करा कारण...

व्हॉट्स अ‍ॅप

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्स अ‍ॅपमध्ये स्पायवेअर डिटेक्ट झाला आहे. व्हॉट्स अ‍ॅपनं या समस्येचं निराकरण केलं आहे मात्र तरीही युजर्सनां सुरक्षेच्या कारणास्तव व्हॉट्स अ‍ॅप पुन्हा एकदा अपडेट करण्यास सांगण्यात आलं आहे.  या  स्पायवेअरचा फटका किती युजर्सना बसला आहे हे मात्र कंपनीनं अद्यापही उघड केलेलं नाही. 

व्हॉट्सअॅप ऑडिओ कॉलद्वारे  हा स्पायवेअर  युजर्सच्या डिव्हाइसमध्ये जातो. व्हॉट्सअॅप ऑडिओ कॉल उचलला गेला नसला तरीही हा स्पायवेअर आपोआप मोबाईल डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल होतो असं  टेक क्रंचनं म्हटलं आहे. या स्पायवेअरचा किती  युजर्सनां फटका बसला आहे हे समजलं नाही मात्र ही संख्या कमी असल्याचं समजत आहे. 

वॉइस कॉलच्या सुरक्षतेवर  काम करत असताना  व्हॉट्स अॅपला हा बग निदर्शनास आला. काही युजर्सनां अज्ञात क्रमांकवरून वॉइस कॉल आले. हा कॉल युजर्सकडून उचलला गेला नसला तरी  कॉलदरम्यान हा स्पायवेअर  युजर्सच्या डिव्हाइसमध्ये गेला अशी माहिती व्हॉट्स अॅपच्या प्रवक्त्यानं असोशिएट प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या स्पायवेअरचा फटका  किती युजर्सनां बसला आहे हे समजू शकलं नाही मात्र व्हॉट्स अॅपनं आपल्या सर्व युजर्सनां फोन अपडेट करण्याचा  सल्ला सुरक्षेच्या कारणास्तव दिला आहे.