पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HTLS 2019 : 'जिथे मनोरंजन असते तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा वाद असतोच'

नेटफ्लिक्सचे रीड हॅस्टिंग्ज

आमच्या लेखी कलाकारांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे. त्यामुळे आमचे काही कार्यक्रम काही देशांमध्ये काहींना वादग्रस्त वाटतात. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की जिथे मनोरंजन असते, तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरुपाचा वाद असतोच, असे नेटफ्लिक्सचे संस्थापक रीड हॅस्टिंग्ज यांनी शुक्रवारी सांगितले. हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिट २०१९ मध्ये बोलताना त्यांनी नेटफ्लिक्सची सुरुवात आणि प्रवास याचे धागे उलगडले.

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

हॅस्टिंग्ज म्हणाले, नेटफ्लिक्सवरील कार्यक्रमांचा दर्जा कसा उच्च राहिल, यावरच आम्ही सर्वाधिक भर देतो. जर कार्यक्रम उत्तम असतील तर प्रेक्षक सहजपणे आपल्याकडे येऊ शकतात. त्यामुळेच आम्ही प्रसिद्धीवर फारसा खर्च करीत नाही. त्यापेक्षा कार्यक्रमांच्या निर्मितीवर आम्ही जास्त खर्च करतो. प्रेक्षकांना कार्यक्रम आवडला तर ते नक्कीच एकमेकांना त्याबद्दल सांगतात आणि त्यातून आमची प्रसिद्धी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आगामी ५ ते १० वर्षे टेलिव्हिजन क्षेत्रासाठी सोनेरी काळ असणार असल्याचे सांगून हॅस्टिंग्ज म्हणाले, ज्या देशात आमची सेवा उपलब्ध आहे तेथील कायदे आणि नियमांचे पालन आम्हाला करावेच लागते. स्टोरी टेलिंग हाच आमच्या व्यवसायाचा पाया आहे. आमची स्पर्धा सध्या डिस्ने, हॉटस्टार आणि ऍमेझॉन यांच्याशी आहे. पण प्रेक्षकांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी आम्हाला कायम स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहणे आवश्यक वाटते. 

'यूपी आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'

सध्या भारताबाहेर राहणाऱ्या २.७ कोटी कुटुंबांनी छोटा भीम कार्यक्रम बघण्यास सुरुवात केली असल्याचे सांगून ते म्हणाले, नेटफ्लिक्समध्ये आम्ही जाहिरात क्षेत्राशी निगडीत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की कोणते कार्यक्रम बघता, त्यावर आधारित जाहिराती तुम्हाला दाखविण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही. त्यासाठीच आमच्याकडे प्रेक्षकांचा डेटा सर्वाधिक सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.