पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फत्तेशिकस्त टीझर : स्वराज्याच्या शत्रूला नामोहरण करणारा 'सर्जिकल स्ट्राईक'

फत्तेशिकस्त

शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं. स्वराज्यावर कुरघोड्या करण्यासाठी अनेक शत्रू पुढे आले पण महाराज आणि स्वराज्यासाठी लढणारे मावळे साऱ्या शत्रूला पुरून उरले. महाराजांनी अनेक लढया लढल्या. या लढाईची  शौर्यगाथा इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरांनी कोरली आहे. गनिमीकावा ही मराठ्यांची युद्धीनिती होती. पण फत्तेशिकस्त  चित्रपटाच्या निमित्तानं मराठ्यांच्या इतिहासातील पहिल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची शौर्यगाथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

'आर. के. स्टुडिओ विकला, आता गणेशोत्सव नाही'

या चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. महाराज आणि जिजाऊमातांची युद्धनिती, लढवय्ये सरदार आणि मावळ्यांच्या धाडसाची एक झलक फत्तेशिकस्तच्या टीझरमध्ये पहायला मिळणार आहे. पहिला सर्जिकल स्ट्राईक जरी महाराजांनी केला असला तरी यामागची व्यूहात्मक रचना ही जिजाऊ मातांची होती.' असं या चित्रपटाचे दिग्दर्शक  दिग्पाल लांजेकर म्हणाले.

रानू मंडलला सलमाननं ५५ लाखांचा फ्लॅट दिल्याच्या निव्वळ अफवा

'फत्तेशिकस्त' हा 'फर्जंद' चित्रपटाचा सीक्वल असल्याची चर्चा होती. मात्र हा चित्रपट सीक्वल किंवा प्रीक्वल नसून महाराजांवरील चित्रपट मालिकांचा एक भाग असणार आहे असंही ते म्हणाले. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर यांसारख्या मातब्बर कलाकारांची फौज  या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मृणाल कुलकर्णी जिजाऊ मातांच्या भूमिकेत दिसेन तर शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकर  चित्रपटात साकारणार आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.