पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Super 30 trailer : उठा, शिका, लढा आणि पुढे जा, हृतिकचा गुरूमंत्र

सूपर ३०

अभिनेता हृतिक रोशनच्या बहुप्रतिक्षित अशा  'सुपर ३०' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. गरीब मुलांना मोफत शिकवणी देणाऱ्या बुद्धीवान गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. 

 आनंद कुमार अत्यंत हुशार, बुद्धीवान शिक्षक जो श्रीमंत घरातील मुलांना शिकवणी देतो. मात्र आपल्या ज्ञानाचा गैरवापर होत आहे, पैसे कमावण्याच्या शर्यतीत गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क मात्र मारला जातोय हे लक्षात आल्यावर आनंद कुमार चांगल्या पगाराच्या नोकरीवर लाथ मारतात.  गरीब मुलांसाठी स्वत: कोचिंग क्लास सुरू करतात अशी कहाणी  या चित्रपटाची आहे. त्यांच्या जिद्दीची कहाणी  'सुपर ३०' मध्ये पहायला मिळणार आहे. हृतिक या चित्रपटात आनंद कुमार यांच्या भूमिकेत आहे. १२ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

हा चित्रपट गेल्यावर्षी म्हणजेच २०१८ मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र अनेक कारणांमुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबलं गेलं. अखेर पुढील महिन्यात चित्रपट प्रदर्शित होत आहे. उठा, शिका, लढा आणि पुढे जा असा गुरुमंत्र देणारा हा शिक्षक प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहण्यासारखं ठरेन.