'बाजीराव मस्तानी' मधली 'मस्तीनी' असो, की 'पद्मावत' मधली राणी 'पद्मावती' , अभिनेत्री दीपिका पादुकोननं या भूमिकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. 'रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'पिकू' अशा अनेक चित्रपटांतून आपल्या प्रभावशाली अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवल्यानंतर दीपिका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तिच्या आगामी 'छपाक' चित्रपटाच्या प्रतिक्षेत चाहते आहेत. अखेर या चित्रपटाचा तितकाच प्रभावशाली ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
दीपिकाने जाळले ‘छपाक’चे प्रोस्थेटिक्स
अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या, स्वत:साठी आणि अशा असंख्य अॅसिड हल्ल्यातील पीडितेंच्या न्यायासाठी लढणाऱ्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन 'छपाक' तयार करण्यात आला आहे. अॅसिड हल्ल्यानंतर एका मुलीचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. चेहरा विद्रुप झाल्यानंतर आलेलं नैराश्य, राग ती चीडचीड आणि या साऱ्याला मागे टाकत न्यासाठी लढणाऱ्या एका असामान्य मुलीच्या जिद्दीची, सुख: दु:खाची, संघर्षाची ही कथा आहे.
दीपिका पादुकोन साकारणार द्रौपदी
मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेस्सीचीही प्रमुख भूमिका आहे. १० जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत असून याच दिवशी अजय देवगनचा 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' चित्रपटही प्रदर्शित होत आहे.
लष्करातील शूरवीरांवर मालिका, महिंद्रसिंग धोनी करणार निर्मिती