पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#TanhajiMarathiTrailer : गोष्ट एका झंझावाताची

तान्हाजी द अनसंग वॉरियर

'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित असा मराठी ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. रोम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट हिंदीबरोबरच महाराष्ट्रात मराठीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जयंती विशेष : नाटकवेडे कलंदर व्यक्तिमत्व!

'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' म्हणणारे तान्हाजी मालुसरेंचं नाव स्वराज्याच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. तहात गेलेला कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणण्याची शपथ त्यांनी घेतली. शेवटच्या श्वासापर्यंत ते कोंढाणा मिळवण्यासाठी लढले. कोंढाणा स्वराज्यात आला पण स्वराज्याचा 'सिंह' गेला. कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची महाराजांची मोहीम  फत्तेह झाली, 'गड आला पण सिंह गेला' म्हणत राजेही हळहळले. स्वराज्यातील अशा या शूर सिंहाची शौर्यगाथा 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या रुपानं रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

कॉमेडियन कपिल शर्मा झाला बाबा

या चित्रपटात अजय देवगन प्रमुख भूमिका साकारत आहे. तो तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत आहे.  तान्हाजींची भूमिका साकारण्यासाठी अजयनं गेल्या वर्षभरापासून मेहनत घेतली आहे. हा चित्रपट १० जानेवारी  २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात उदयभानच्या भूमिकेत सैफ अली खान आहे. तर  अभिनेत्री काजोलनं तान्हाजी मालुसरेंच्या पत्नी सावीत्रीबाईंची भूमिका साकारली आहे. 

दहा वर्षांच्या ब्रेकनंतर सुष्मिता परतणार बॉलिवूडमध्ये