पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वॉर चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चौथ्या दिवशी केली इतकी कमाई

वॉर चित्रपट

बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या वॉर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी देखील रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. प्री-बुकिंगमध्येच या चित्रपटाने ३१ ते ३२ कोटींची कमाई आपल्या नावावर नोंद केली होती. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. 

विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वॉड्रनचा हवाईदलाकडून सन्मान

पहिल्या दिवशी वॉर चित्रपटाने ५१.६० कोटी (हिंदी) तर १.७५ कोटी (तमिळ आणि तेलगू) अशी कमाई केली होती. दसऱ्या दिवशी २३.१० कोटी (हिंदी), १.२५ कोटी (तमिळ आणि तेलगू) अशी कमाई केली होती. तर तिसऱ्या दिवशी २१.३० कोटी (हिंदी), १.१५ कोटी (तमिळ आणि तेलगू) अशी कमाई केली होती. आता चौथ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने २७ ते २८ कोटींची कमाई आपल्या नावावर केली आहे. 

सैन्य दलाच्या त्रासाला कंटाळून चंदू चव्हाणने दिला राजीनामा

बॉक्स ऑफिस आणि चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या चित्रपटाने १२२ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. वीकेंड पाहता या चित्रपटाने झपाट्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसह या चित्रपटाच्या टीमने नुकताच याचे सेलिब्रेशन केले होते. 

कोयना आणि प्रगती एक्स्प्रेस १० दिवसांसाठी रद्द