पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वॉर'चा बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा 'धमाका'

वॉर

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट महिन्याच्या सुरूवातीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं ३०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. २०१९ मधला ३०० कोटींची कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

एक्स गर्लफ्रेंड प्रियांकाला शाहिदचा सल्ला

तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ३ आठवड्यात ३०९. ३५ कोटींची कमाई  केली आहे. हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं २९५ कोटी आणि तामिळ, तेलगू भाषेत एकूण १४.३५ कोटींची कमाई केली आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 

यापूर्वी गेल्या पाच वर्षांत ७ चित्रपटांनी ३०० कोटींची कमाई केली होती. यात आमिर खानचा पिके, दंगल, सलमान खानचा बजरंगी भाईजान, सुलतान, टायगर झिंदा है, रणबीरचा  संजू, दीपिका पादुकोनचा पद्मावत या चित्रपटांचा समावेश आहे. 
दोन वर्षांनंतर बच्चन यांच्या घरी दिवाळी पार्टी