पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऐश्वर्यावरील वादग्रस्त मीम्सनंतर पहिल्यांदाच विवेक-अभिषेक आमने-सामने

अभिषेक बच्चन - विवेक ओबेरॉय

अभिनेता विवेक ओबेरॉयनं काही महिन्यांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चनशी निगडीत एक टिप्पणी केली होती. लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर त्यानं ऐश्वर्याच्या भूतकाळातील नात्याची खिल्ली उडवणार मीम शेअर केलं होतं. ज्यामुळे मोठा वाद झाला होता. देशभरातून विवेकवर मोठी टिका झाली होती. 

Prithviraj : अक्षय साकारणार राजा पृथ्वीराज चौहान यांची भूमिका

या गोष्टीला जवळपास चार महिने झाले. आता चार महिन्यांनंतर  अभिषेक बच्चन, विवेक ओबेरॉय आणि अमिताभ बच्चन आमने- सामने पहायला मिळाले. मुंबईतील पी.व्ही. सिंधूच्या सत्कार समारंभाच्यावेळी अनेक कलाकार उपस्थित होते.

या सोहळयास विवेक ओबेरॉयचं संपूर्ण कुटुंब आणि अभिनेते अमिताभ- अभिषेक बच्चन देखील होते.  या दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांचं हसतमुखानं स्वागत केलं. बच्चन यांनी ओबेरॉय कुटुंबियांची चौकशीदेखील केली. अभिषेकनं विवेकची गळाभेटही घेतली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वीणाने दिलेले बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क

विवेक हा ऐश्वर्याचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आहे. ते दोघंही १९ वर्षांपूर्वी एकमेकांना डेटही करत होते. विवेकनं एक्झिट पोलची खिल्ली उडवताना ऐश्वर्यासोबतच्या आपल्या नात्याचा संदर्भ देत मीम्स शेअर केलं होतं. त्यानंतर विवेकला मोठ्या रोषाला समोरं जावं लागलं होतं.  विवेकनं केलेल्या टिप्पणीवरून त्याला राष्ट्रीय महिला आयोगानं नोटीसही पाठवली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vivek Oberoi was spotted exchanging hugs with Abhishek Bachchan after Aishwarya Rai meme controversy