पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज

'गर्ल्स'

'बॉइज' आणि 'बॉइज 2' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर  'गर्ल्स' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  मराठी चित्रपटांमध्ये मुलांवर आधारित, त्यांच्या शाळा, कॉलेज जीवनावर आधारित अनेक चित्रपट आलेत किंबहुना येतच असतात. मात्र, मुलींवर आधारित, त्यांच्या मजा मस्तीवर आधारित चित्रपट अजून आलेच नाहीत.  हीच मजा, मस्ती पडद्यावर दाखवण्यासाठी दिग्दर्शक देवरुखकर 'गर्ल्स' हा एक धमाल मनोरंजक चित्रपट घेऊन येत आहेत.

'गर्ल्स' आणि 'फत्तेशिकस्त' मधली टक्कर टळली

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. आतापर्यंत या चित्रपटाची चर्चा होती. मात्र यात अभिनेत्रीं कोण आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. चित्रपटाचा पोस्टर व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. देवरुखकर यांच्या चित्रपटातील 'गर्ल्स' नेमक्या आहेत कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांना आहे. 

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते... 

२९ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. लवकरच या चित्रपटातील अभिनेत्रींवरून पडदा उठणार आहे.