पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..म्हणून पतीसोबत काम करत नाही विद्या बालन

विद्या बालन

विद्या बालन ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. विद्याची काम करण्याची पद्धत ही अन्य बॉलिवूड कलाकारांपेक्षा खूपच वेगळी आहे. कलाकरांनी फॅशन आणि ट्रेंडपेक्षा अभिनयावर अधिक लक्ष द्यावं असं मानणारी ती आहे. साइज झिरो फिगर, डिझायनर पाश्चिमात्य कपडे यांना विद्याच्या दृष्टीनं फार महत्त्व नसते. ती बरेचदा साडी आणि टिकली अशा वेशात वावरताना दिसते.

'गेम ऑफ थ्रोन्स'मधली 'डेनेरेस तारगारयेन'ची भारतभ्रमंती

विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूर हे बॉलिवूडमधले नावाजलेले निर्माते आहेत. अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. मात्र सिद्धार्थ रॉय कपूर सोबत  विद्या काम करणं टाळते. यामागचं कारण तिनं सांगितलं आहे. 'सिद्धार्थ हा माझा पती आहे मात्र पती पत्नीचं नातं मला व्यवसायात आणायचं नाही. अनेकदा चित्रपटक्षेत्रात  काम करताना भूमिका, मानधन, चित्रपटाची कथा यांसारख्या अनेक कारणांमुळे कलाकार आणि निर्माते, दिग्दर्शक यांच्यामध्ये मतभेद होता. मात्र व्यावसायिक क्षेत्रांतील मतभेदांचा परिणाम मला नात्यावर होऊ द्यायचा नाहीये. 

'कपिल शर्मा शोमध्ये मी आल्यापासून लोक गुत्थीला विसरले'

समजा सिद्धार्थ एका चित्रपटाची निर्मिती करत असेन आणि त्यानं मला अमूक एक मानधन घेऊन काम कर असं सांगितलेलं मला आवडणार नाही. मी त्याच्याकडे अधिक मानधन मागेन. यावरुन मतभेद होतील, कदाचित वादही होतील त्यामुळे हे टाळ्यांसाठी मी पती सिद्धार्थ सोबत काम करणं टाळते, असं विद्या अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखती म्हणाली.