पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्की वेलिंगकर : अवधूत-ओमकारच्या आवाजतलं 'टीकिटी टॉक' ऐकलंत का?

विक्की वेलिंगकर

सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा  टीजर  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या टीझरने समाजमाध्यमांवर चांगलीच हलचल निर्माण केली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे नवीन गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

Video : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या या नवीन गाण्याचे ‘पळे मागे दुनिया सारी, तुझ्या हाती सबकी दोरी, तुझ्यापुढे सगळेच फ्लॉप! टीकिटी टॉक टीकिटी टॉक, टाइम मिळाला घेऊन टाक’ असे या गाण्याचे बोल असून हे उत्साहित करणारे गाणे अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील या दोघांनी गायले आहे. ओमकार पाटील यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सुमित तांबे यांचे शब्द लाभले आहेत. आयुष्यात वेळेचे कीती महत्व आहे हे या गाण्यावरून सूचित होते. या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे पॉप रॉक प्रकारचा असून हे 'टीकिटी टॉक' गाणे ऐकल्यानंतर  प्रेक्षकांमध्ये ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाची उत्कंठा अधिकच वाढेल यात काही शंका नाही.

राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप