पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय सैन्यांसाठी विकी घेतोय स्वयंपाकाचे धडे

विकी कौशल

अभिनेता विकी कौशल तवांगमधील भारत-चीन सीमारेषेजवळ तैनात करण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीसोबत राहत आहे.  भारतीय सैन्यांच्या तुकडीसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी लाभली ही खूपच अभिमानाची बाब आहे असंही विकी म्हणाला. विकीनं पहिल्यांदाच सैनिकांसाठी स्वयंपाकही केला. 

अभिनेत्रीच्या भेटीचं आमिष दाखवून चाहत्याला ६० लाखांचा गंडा

सैनिकांसाठी स्वयंपाक करण्याच्या कामात विकीनं हातभार लावला. त्यानं आलेल्या नव्या अनुभवाचा फोटो आपल्या सोशल मीडिया साइटवर शेअर केला आहे. मी पहिल्यांच पोळी तयार केली तीही भारतीय सैनिकांसाठी याचा मला अभिमान आहे, असं विकीनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

या मराठी कलाकाराच्या अभिनयानं प्रभावित झाली परिणीती चोप्रा

विकी भारत-चीन सीमारेषेजवळ तवांगमध्ये  १४ हजार फूट उंचीवर  तैनात करण्यात आलेल्या तुकडीसोबत राहत आहेत.  सैन्यांसोबत दिवस व्यतीत करण्याची संधी दिल्याबद्दल त्यानं भारतीय लष्कराचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The first ever roti I made... glad it was for the army.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

तो लवकरच फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या बायोपिकचं नाव 'सॅम' असणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल होते. भारत पाक युद्धात पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत त्यांनी शरण आणलं होतं. ते 'सॅम बहादूर' म्हणूनही प्रसिद्ध होते. मुत्सद्देगिरीने अत्यंत प्रभावी युद्धीनिती आखण्यासाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या भूमिकेत विकी दिसणार आहे.