पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तवांगमध्ये भारतीय सैन्यांसोबत काही दिवस राहणार अभिनेता विकी कौशल

विकी कौशल

'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता विकी कौशल काही दिवस भारतीय सैन्यासोबत व्यतीत करणार आहे. विकीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. तवांगमधील भारत-चीन सीमारेषेजवळ तैनात करण्यात आलेल्या सैन्याच्या तुकडीसोबत तो राहणार आहे. 

अभिनेत्री दिया मिर्झा पतीपासून विभक्त

भारतीय सैन्यांसोबत भारत-चीन सीमारेषेजवळ तवांगमध्ये  १४ हजार फूट उंचीवर काही दिवस व्यतीत करण्याची संधी मला मिळाली, याचा मला  अभिमान आहे असं विकीनं आपल्या पोस्टमध्ये लिहित आनंद व्यक्त केला आहे. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

२०१९ च्या सुरूवातीला 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' सारखा यशस्वी चित्रपट देणारा विकी सध्या दोन बायोपिकमध्ये काम करत आहे. स्वातंत्र्यसैनिक सरदार उधम सिंह आणि फिल्ड मार्शल  सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये तो दिसणार आहे.