जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' हा चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्यात येणार आहे. 'कारगिल विजय दिना'चं औचित्य साधून हा चित्रपट २६ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता.
मला दिवसाला खर्चासाठी २० रुपये मिळायचे- विकी
उरीमधील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्याचा भारतानं सर्जिकल स्ट्राइक करत सूड घेतला. भारतीय जवानांच्या धाडसाची आणि शौर्याची कथा या चित्रपटात दाखवली आहे. 'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार हा चित्रपट २६ जुलैला चित्रपटगृहात पुनर्प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'
२०१९ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' पहिल्या क्रमांकावर होता. मात्र जूनमध्ये कबीर सिंह या चित्रपटानं 'उरी'चा रेकॉर्ड मोडला. त्यामुळे सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत 'उरी' दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटामुळे अभिनेता विकी कौशलच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली होती. विकीच्या करिअरमधला हा यशस्वी चित्रपट ठरला.