पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेत

विकी कौशल

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित बायोपिक काढण्याचा निर्णय मेघना गुलजारनं घेतला आहे. या चित्रपटात विकी कौशल प्रमुख भूमिकेत असून तो सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणार आहे. त्यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्तानं सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली. या बायोपिकचं नाव 'सॅम' असणार आहे.

IT'S OFFICIAL : 'दोस्ताना २' येणार, जान्हवी-कार्तिक प्रमुख भूमिकेत

स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लष्कराचे ते पहिले फिल्ड मार्शल होते. भारत पाक युद्धात पाकिस्तानी लष्कराला १८ दिवसांत त्यांनी शरण आणलं होतं. ते 'सॅम बहादूर' म्हणूनही प्रसिद्ध होते. मुत्सद्देगिरीने अत्यंत प्रभावी युद्धीनिती आखण्यासाठी ते ओळखले जायचे. 
'मी त्यांचं यश पाहिलं नाही मात्र माझ्या पालकांकडून सॅम यांच्याविषयी मी बरंच काही ऐकलं होतं. ते अत्यंत निर्भिड होते. ते सच्चे देशभक्त होतेच पण त्यांच्यामध्ये उत्तम नेतृत्त्वगुणही होते. १९७१ च्या भारत पाक युद्धाविषयी वाचताना मला प्रथम त्यांची माहिती मिळाली', असं विकी कौशल म्हणाला. 

सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारणं हे अत्यंत जबाबदारीचं काम असल्याचंही तो म्हणाला. 'सॅम' या बायोपिकनिमित्तानं मेघना गुलजार आणि विकी कौशल दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यापूर्वी 'राझी' चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील विकीचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांनाही तो खूपच आवडला आहे. 

मलायकानं अखेर अर्जुनसोबतचं नातं केलं मान्य

'उरी द सर्जिकल स्ट्राईक्स'च्या यशानंतर विकी कौशलच्या लोकप्रियतेत वाढ झाली. विकी सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकबरोबर  'सरदार उधम सिंह' या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत आहे.  हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. सरदार उधम सिंह  हे स्वतंत्र सेनानी होते. ही स्वतंत्र्यपूर्व भारताची कथा आहे. इंग्रजाविरोधात  चळवळ भारतात उभी राहत होती, सरदार उधम सिंह यांनी इंग्लडमध्ये जाऊन ऑफिसर डायर याची हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्यांकांडाचा सूड घेण्यासाठी त्यांनी डायर यांची  हत्या केली होती. त्यांच्या जीवनावर हा  चित्रपट आधारलेला आहे.  सूजित सरकार या  चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Vicky Kaushal playing role of Field Marshal Sam Manekshaw in Meghna Gulzar upcoming movie sam