पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅटसोबत काम करण्याचं विकीचं स्वप्न होऊ शकतं पूर्ण

Vicky Kaushal,  Katrina kaif

अभिनेता विक कौशल 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'च्या यशानंतर खूपच चर्चेत आला आहे. २०१९ मधला  हा पहिला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानं विकी हा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्याच्या यादीतही सहभागी झाला आहे. यशस्वी अभिनेता होण्याचं विकीचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आता कतरिनासोबत काम करण्याची त्याची इच्छा पूर्ण होणार असल्याचंही दिसतंय.

काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये विकीनं कतरिनाला डेट करण्याची आणि तिच्यासोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. इतकंच नाही तर प्रेयसी हरलिन सेठीसोबत  विकीचं ब्रेकअपही याच कारणामुळे झालं असल्याची चर्चा  होती. आता विकी कतरिनासोबत रोनी स्क्रुवालाचा चित्रपटात दिसू शकतो अशा चर्चा आहे.  रोनी स्क्रुवाला हे एका सत्य घटनेवर आधारित प्रेमकहाणीवर चित्रपट तयार करण्याचा विचार करत आहेत. या कथेसाठी विकी कौशल आणि कतरिनाची वर्णी लागू शकते. अद्यापही या वृत्ताला रोनी यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र कतरिना आणि विकीची जोडी पाहण्यास चाहते उत्सुक आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका मुलाखतीत नाव न छापण्याच्या अटीवरून कतरिनाच्या मैत्रीणीनं विकीवर टीका केली होती. विकी कतरिनाची स्वप्न पाहत आहे मात्र कतरिनाला त्याच्याविषयी कोणत्याही भावना नाही असं तिनं स्पष्ट केलं होतं. नंतरच्या काळात हरलिन आणि विकीचं ब्रेकअप हे अभिनेत्री भूमी पेडणेकरमुळे झाल्याचं समोर आलं. विकीची भूमिशी असणारी वाढती जवळीक हरलीनला खटकत होती म्हणून हे ब्रेक अप झाल्याचं समोर आलं. 

सध्या कतरिना रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी चित्रपटात व्यग्र आहे. तर विकी हा उधम सिंग चित्रपटात व्यग्र  आहे.