पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून विकीनं घटवलं १३ किलो वजन

विकी कौशल

संजू, राझी, उरी द सर्जिकल स्ट्राईक्स यांसारख्या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला विकी कौशल लवकरच दोन महत्त्वाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. यातली पहिली बायोपिक आहे ती सरदार उधम सिंह यांची. या चित्रपटासाठी विकीनं खूपच मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी  विकीनं जवळपास १३ किलो वजन घटवलं आहे. 

 'उदी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या यशानंतर विकीला 'सरदार उधम सिंह' यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाला. या चित्रपटाचं शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू झालं होतं. जानेवारी ते मे असं चित्रीकरणाचं पहिलं वेळापत्रक होतं. ऑक्टोबरपासून चित्रीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे . तत्पूर्वी विकीला १३ किलो वजन घटवण्यासाठी सांगण्यात आलं. विकी तरुणपणीच्या उधम सिंह यांच्या भूमिकेत योग्य दिसावा यासाठी त्याला वजन घटवण्यात सांगण्यात आलं. 

देवीची रुपं साकारण्यासाठी तेजस्विनीनं घेतली कित्येक दिवसांची मेहनत

वजन घटवणं नक्कीच सोप्पी गोष्ट नव्हती. अनेकवेळा आवडीचे पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण व्हायची मात्र मोह आवरावा लागला. वजन घटवण्यासाठी दररोज मेहनत घेतली, असं विकी म्हणाला. या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर काही अवधीतचं तख्त चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरूवात होणार आहे. यासाठी विकीला जेवढ वजन घटवलं आहे त्यापेक्षा अधिक वाढवायचं आहे. त्यामुळे विकीसाठी ही गोष्ट नक्कीच एका आव्हानात्मक असणार हे नक्की.

BB 13 : अमीषा पटेल बिग बॉसच्या घराची नवी 'मालकीण'

'सरदार उधम सिंह' यांचा  बायोपिक २०२० मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित  होणार आहे. सरदार उधम सिंह  हे स्वतंत्र सेनानी होते. ही स्वतंत्र्यपूर्व भारताची कथा आहे. इंग्रजाविरोधात  चळवळ भारतात उभी राहत होती, सरदार उधम सिंह यांनी इंग्लडमध्ये जाऊन ऑफिसर डायर याची हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्यांकांडाचा सूड घेण्यासाठी त्यांनी डायर यांची  हत्या केली होती. त्यांच्या जीवनावर हा  चित्रपट आधारलेला आहे.  सूजित सरकार या  चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.