पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कतरिनाला डेट करण्याच्या प्रश्नावर विकीचा 'सेफ गेम'

कतरिनाला डेट करण्याच्या प्रश्नावर विकीचा 'सेफ गेम'

अभिनेता  विकी कौशल आणि कतरिना कैफ एकमेकांना डेट करत आहेत अशा बातम्या वारंवार पहायला मिळत आहे. मात्र विकी किंवा कतरिनानं यावर न बोलणंच पसंत केलं आहे. 

सिद्धार्थच्या विजयामुळे सलमान नाराज, 'बिग बॉस' सोडणार?

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत डेटिंगच्या प्रश्नावर  विकीनं 'सेफ गेम' खेळत उत्तर देणं पसंत केलं. मात्र कतरिनाला डेट करत असल्याचं त्यानं स्वीकारही केलं नाही किंवा अमान्यही केलं नाही.  मला माझ्या खासगी आयुष्याभोवती एक भींत उभारायची आहे. आशा आहे की प्रत्येकजण या मताचा आदर करेल. मी खासगी आयुष्याविषयी बोललो तर  त्यातून चुकीचे अर्थ काढले जातील, त्यावर चर्चा रंगतील, त्या चुकीच्या दिशेनं जातील, त्यामुळे मला या सगळ्या समस्यांना आमंत्रण द्यायचं नाही, असं विकी म्हणाला. 

कंगनाच्या 'तेजस'चा फर्स्ट लूक समोर

मला आता कोणत्याही गोष्टीविषयी  बोलायचं नाही असंही विकीनं स्पष्ट केलं. गेल्यावर्षीच्या दिवाळी पार्टीत विकी आणि कतरिना कैफ एकत्र दिसले होते, तेव्हापासून ते दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. विकी हा टीव्ही अभिनेत्री हरलिन शेठीला डेट करत होता तर कतरिना रणबीर कपूरला डेट करत होती.