पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सरदार उधम सिंह' चित्रपट गांधी जयंतीला होणार प्रदर्शित

सरदार उधम सिंह

अभिनेता विकी कौशलच्या बहुप्रतिक्षीत अशा  'सरदार उधम सिंह'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. 'उदी द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाच्या यशानंतर विकीला 'सरदार उधम सिंह' यांची भूमिका साकारण्याचा मान मिळाला. या चित्रपटाचं शूटिंग जानेवारी महिन्यात सुरू झालं होतं. जानेवारी ते मे असं चित्रीकरणाचं पहिलं वेळापत्रक होतं. ऑक्टोबरपासून चित्रीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे . 

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 'सरदार उधम सिंह' यांचा  बायोपिक २०२० मध्ये गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित  होणार आहे. सरदार उधम सिंह  हे स्वतंत्र सेनानी होते. ही स्वतंत्र्यपूर्व भारताची कथा आहे. इंग्रजाविरोधात  चळवळ भारतात उभी राहत होती, सरदार उधम सिंह यांनी इंग्लडमध्ये जाऊन ऑफिसर डायर याची हत्या केली होती. जालियनवाला बाग हत्यांकांडाचा सूड घेण्यासाठी त्यांनी डायर यांची  हत्या केली होती. त्यांच्या जीवनावर हा  चित्रपट आधारलेला आहे.  सूजित सरकार या  चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.