पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट तामिळ रॉकर्सवर लीक

'भूत' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान'

बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपट 'भूत पार्ट वन - द हॉन्टेड शिप' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हे शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही चित्रपटांना प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच धक्का बसला आहे. दोन्ही चित्रपट लीक झाले आहेत. तामिळ रॉकर्स वेबसाईटवर एचडी प्रिंटमध्ये दोन्ही चित्रपट लीक झाले आहेत. 

आयुष्मानच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान'वर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

तामिळ रॉकर्सच्या वेबसाईटवर हा चित्रपट लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट लीक झाले आहेत. चित्रपट लीक झाल्यामुळे त्याचा प्रभाव बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल सांगायचे झाले तर, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ९.२५ कोटींची कमाई केली. तर विकी कौशलच्या ‘भूत पार्ट वन - द हॉन्टेड शिप’ या चित्रपटाने ५ कोटींची कमाई केली.

स्वीटी सातारकर' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच

तामिळ रॉकर्स वेबसाईटवर याआधी सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा 'लव आज कल' हा चित्रपट लीक झाला होता. दरम्यान, 'भूत' चित्रपटांमध्ये विकी कौशल आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान मुख्य भूमिकेत आहेत. 'भूत' चे दिग्दर्शन भानु प्रताप सिंह यांनी केले आहे, तर 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचे दिग्दर्शन हितेश केवल्य यांनी केले आहे. 

गुड न्यूज: शिल्पा शेट्टीला कन्यारत्न!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:vicky kaushal film bhoot and ayushmann khurrana film shubh mangal zyada saavdhan leaked online