पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कार्तिक, शाहिदला मागे टाकत विकी ठरला 'नंबर वन' लोकप्रिय अभिनेता

विकी कौशल

नुकत्याच रिलीज झालेल्या 'भूत' याभयपटानंतर बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता बनलेला आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत बाकी बॉलीवूड अभिनेत्यांना मागे टाकत विकी कौशल लोकप्रियतेत शिखरावर असलेला दिसून आलेला आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

महापुरुषांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता, निलेश साबळेची माफी

या आकडेवारीनुसार, व्हायरल न्यूज सेक्शनमध्ये विकी कौशलने १०० गुणांसह लोकप्रियतेत प्रथम स्थान पटकावले आहे. विकीचा नुकताच रिलीज झालेल्या  ‘भूत’ चित्रपटामुळे आणि कैटरीना कैफसोबत असलेल्या त्याच्या घनिष्ट मैत्रीमुळे व्हायरल न्यूजमध्ये तो सतत चर्चेत राहिलेला आहे. आणि यामुळेच तो नंबर वन स्थानी पोहोचला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aunty ne toh #Bhoot dekh li... aur aapne? #InCinemasNow

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर ४६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्याने चित्रीकरण पुन्हा सुरू करणे, आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदने साजरा केलेला वाढदिवस या सगळ्या कारणांमुळे तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता. आणि म्हणूनच तो बाकी बॉलीवूड स्टार्संना मागे टाकून दूसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

PHOTOS : छोट्या पडद्यावरील 'लाडकी सून' आता बॉलिवूडमध्ये !

कार्तिक आर्यनची फिल्म ‘लव आज कल २’बॉक्स ऑफिसवर जरी चांगली चालली नाही. तरीही त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही आहे. आजही कार्तिक युवावर्गात खूप लोकप्रिय आहे. म्हणूनच तो 41 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
टाइगर श्रॉफची फिल्म ‘बागी 3’ रिलीज़ झाल्यानंतर तो लोकप्रियतेची शिखरे पादाक्रांत करताना दिसतोय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आंकडेवारीनुसार, टाइगर ३८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. बॉक्स ऑफिसवर २८० कोटी पार केलेली फिल्म तान्हाजीमुळे सुपरस्टार अजय देवगन लोकप्रियतेत अजूनही दिसून येतोय. ३६ गुणांसह अजय पाचव्या स्थानी आहे.